किड्स पॅराडाईज ची अभिनव सामाजिक दिवाळी…
पातूर : डोक्यावर छत नसलेल्या कुटुंबाला घर उभं करून देण्यासाठी पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या शालेय मंत्रीमंडळाने पुढाकार घेतला. याला शाळा आणि विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत रस्त्यावर पाल मांडलेल्या कुटुंबाला निवारा उभा करून सामाजिक भान जपासले आहे.दिवाळीच्या पर्वावर एक हात मदतीचा असा उपक्रम दरवर्षी पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल च्या वतीने राबविला जातो. यावर्षी शालेय मंत्री मंडळाने रस्त्याच्या कडेला पाल मांडलेल्या एका कुटुंबाला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका सौं. ज्योत्स्ना गाडगे यांनी पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला. शालेय मंत्रिमंडळ यांनी मदत उभी करीत शाळेतील विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन केले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मदतीचा हात पुढे केला. जमा झालेल्या रक्कमेत निवारा उभे करणे शक्य नव्हतं परंतु शाळेचे अध्यक्ष गोपाल गाडगे यांनी कमी असलेली रक्कम पूर्ण करून निवारा उभा करण्यास मदत केली.बाळापूर रोडवरील रेणुका माता. मंदिराच्या समोर असलेल्या रस्त्याच्या कडेला पाल मांडून एक कुटुंब राहत आहे. लोखंडी अवजार बनवून आपला दैनंदिन जीवनाचा गाडा ते चालवतात. अशा परिस्थितीत अनेकवेळा पाऊस, साप, यामुळे त्यांना त्रास होत होता. याबाबत शालेय मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्री श्रावणी गिऱ्हे हिने याबाबत माहिती दिली. आणि अशा पाल मांडून राहणाऱ्या कुटुंबाच्या वेदना दूर करण्यासाठी शालेय मंत्री मंडळ उभे राहिले.शालेय मंत्री मंडळाचे मुख्यमंत्री श्रावणी गिऱ्हे उपमुख्यमंत्री सिद्धांत वानखडे, गृहमंत्री साहिल पवार, अर्थमंत्री श्रुती तायडे, शिक्षणमंत्री नमिशा सुगंधी, कृषिमंत्री प्रसाद जायभाये, सांस्कृतिक मंत्री शर्वरी दळवे, क्रीडामंत्री क्षितिज वानखडे, आरोग्यमंत्री ओम जाधव, पर्यावरण मंत्री समर्थ पाटील, जलसंपदा मंत्री अपूर्वा गाडगे,महिला व बालकल्याण मंत्री पूर्वी उगले, पालकमंत्री स्पंदन गाडगे,श्रिया कढोणे,प्रणित डिवरे,ईश्वरी जायभाये,सर्वेश गव्हाळे, आर्वी उगले,ऋत्विक बोचरे,अन्वी इंगळे आदी शालेय मंत्रिमंडळाच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.पाल मांडलेल्या या कुटुंबाला निवारा मिळाल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकत होते.या समाजशील दिवाळीच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.या उपक्रमासाठी मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, बजरंग भुजबटराव, अविनाश पाटील, हरिष सौंदळे, रविकिरण अवचार, पंकज अवचार, संकल्प व्यवहारे, नितु ढोणे, नयना हाडके, शानू धाडसे, प्रतीक्षा भारसाकळे, स्वाती वाळोकार, पूजा खंडारे, प्रचाली थोराईत, माधुरी टाले, शीतल गुजर, अंकिता गोळे, ऋतुजा राऊत, नेहा उपर्वट, शुभम पोहरे आदींनी परिश्रम घेतले.