पातूर : दि.23 ऑक्टोबर 2024 रोजी पातूर येथीलनगर परिषद प्राथमिक शाळा क्र.१ शाळेमध्ये विदयार्थ्यांना जनजागृती मोहीम बद्दल पोलीसांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना कायदेशीर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाला उपस्थित महिला पोलीस रेखा तोडसाम,दामिनी अनिता चौधरी, सरस्वती सोनुने व द प्रोफेशनल करिअर अकॅडमी चे संचालक अविनाश पोहरे यांची उपस्थिती होती.सदर अभियान जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून ‘सक्षम’ हा उपक्रम संपूर्ण जिल्हाभर राबवण्यात येत आहे.विद्यार्थ्यांना सुरक्षा व सुरक्षात्मक उपाय योजना, गुड टच – बॅड टच व कायदेविषयक मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रम पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हणमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.तसेच सदर कार्यक्रमाचे आयोजन स्वाती जोशी मुख्याध्यापिका, झाडोकार सर,अनिता भगत,स्वाती गाडगे, सुरेखा चव्हाण, ललिता शिरसाट यांनी केले होते.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विदयार्थ्यांनी हजेरी लावली होती.यामध्ये 150 विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.