पातूर : दि.19 ऑक्टोबर 2024 रोजी डॉ. एच.एन.सिन्हा महाविद्यालय ,पातूर इतिहास विभागाच्यावतीने आयोजित “ऐतिहासिक स्थळांना भेटी” या उपक्रमांतर्गत पातुर येथील प्रसिद्ध ‘नानासाहेब मंदिर ‘ व भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या ‘लेण्या/भुयार ‘ या स्थळांना भेटी देण्यात आल्या.यावेळी या दोन्ही ठिकाणांबद्दल ऐतिहासिक पार्श्वभूमी , रचनेच्या वैशिष्ट्यांबद्दल तसेच याबाबतच्या आख्यायिका इत्यादी माहिती देण्याची संधी मिळाली.यावेळी प्राचार्य डॉ.किरण खंडारे, प्राचार्य अंशुमानसिंह गहिलोत, डॉ. व्हि.जी.वसू, प्रा.निलेश पाकदूने, डॉ.दिपाली घोगरे , डॉ.संजय खांदेल ,प्रा.अरविंद भोंगळे , डॉ.चंदन राठोड, प्रा. महादेव टापरे, डॉ.भानुदास ढोरे, प्रा.पंकज खंडारे, प्रा.उज्वला मनवर, प्रा. गौरी वांडे आदी कर्मचारी उपस्थित होते तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.